ध्येय: मराठी संस्कृती जाणून घेऊ इच्छिणार्या आणि जोपासणार्या सर्वांमधील सांस्कृतिक व सामाजिक असे बंध वृध्दिंगत करणे हे आमचे ध्येय आहे.
- सांस्कृतिक
मकर संक्रांत, गणेशोत्सव, दीपावली अशा मराठी सणांनिमित्त उत्कृष्ट सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन मंडळ करीत असते. त्यायोगे मराठी संस्कृतीच्या वैशिष्ट्यपूर्ण पैलूंची आणि परंपरांची नवीन पिढीला ओळख व्हावी आणि त्यांचे आपल्या संस्कृतीशी नाते जुळावे हा हेतू आहे.
- सामाजिक
न्यू इंग्लंड परिसरातील सामाजिक हेतूने काम करणार्या इतर संस्था अथवा कार्यक्रमांशी निगडीत राहण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो.
अशा देवाण-घेवाणीतून इतर संस्था-संघटनांशी ऋणानुबंध प्रस्थापित होतात.
- रंगमंच
जगातील सर्वोत्कृष्ट आणि विकसित रंगभूमींपैकी एक म्हणून मराठी रंगभूमीची गणना होते. प्रयोगशीलतेतील सातत्यामुळे या रंगभूमीचा दर्जा आणि समज यामध्ये विलक्षण प्रगती झाली आहे.
स्थानिक किंवा भारतातील कलावंतांना आमंत्रित करुन रंगभूमी नाट्यक्षेत्रातील सर्वोत्तम कार्यक्रम सादर करण्याचा मंडळाचा मानस आहे.
- कला
संगीत, नृत्य आणि इतर कलाक्षेत्रातील स्थानिक कलावंतांना मंडळ कायम पाठिंबा, प्रोत्साहन आणि मदत देईल. भारतातून येणार्या कलावंतांचे कार्यक्रमही मंडळ आयोजित करते.
- जॉब नेटवर्किंग
जॉब नेटवर्किंगसाठी एक विशेष गट निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सदस्यांना माहीत असलेल्या संधी इतरांपर्यंत पोचवण्यासाठी आणि अशा संधींच्या शोधात असलेल्यांसाठी या गटाची मोठी मदत होईल.


