Join our community
Community of Marathi Senior Citizens
नमस्कार मंडळी,
नुकत्याच पार पडलेल्या NEMM गणेशोत्सवातून मिळालेल्या ऊर्जेची धग दिवाळीच्या धमाक्यापर्यंत कायम ठेवण्यासाठी घेऊन येत आहोत
१३ ऑक्टोबर २०२३ रोजी फक्त मुली व महिलांसाठी एक खास कार्यक्रम NEMM जल्लोष: उत्सव पारंपारीक खेळांचा"!
मंगळागौर, हरताळीका, भोंडला या रितीरिवाजांच्या निमित्ताने पिढीजात खेळले जाणारे पारंपारीक खेळ ही आपली सांस्क्रुतिक ओळख आहे. सज्ज व्हा आपल्या मैत्रीणींसह झिम्मा-फुगडी, पिंगा आणि इतर खेळ खेळत आपला सांस्क्रुतिक वारसा जपण्यासाठी.
खाली दिलेल्या लिंकद्वारे नोंदणी करा.
Dinner included with registration
Venue:
Academy of Creative Arts
12 A St
Burlington, MA 01803
Date: Friday, October 13, 2023
Time: 6:30 - 10:00 pm
नमस्कार मंडळी! गतवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण आपल्या 'अनुबंध' मासिकाच्या गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर श्री गणेशा करणार आहोत. यावर्षीच्या अनुबंधाचा विषय आहे: "यशोगाथा: वाटचाल ध्येयाकडून यशाकडे_"
आपण आयुष्य जगत असताना अशा काही व्यक्तींना भेटतो, ज्यांनी अपार कष्ट करून यश संपादन केलेलं असतं. काही जणांनी कठीण समस्यांवर मात करून ध्येय गाठलेलं असतं. मग ते ध्येय व्यावसायिक असो, कलेशी निगडित असो वा एखादा जोपासलेला छंद असो! तुम्ही जर अशा 'यशस्वी' व्यक्तींच्या सानिध्यात आला असाल, त्यांची वाटचाल जवळून बघितली असेल किंवा स्वतः त्या वाटेवरून जात असाल तर आम्हाला तुमची कथा वाचायला आणि त्यावरून स्फुरण घ्यायला नक्कीच आवडेल! इतकेच नव्हे, तर आपल्या लहानग्यांचे ध्येय आणि त्यांच्या यशाबद्दलही जाणून घ्यायला आवडेल!
मग वाट कसली बघताय, उचला ती लेखणी आणि आम्हाला तुमचे साहित्य, कथा, लेख, पद्य, चित्रे इत्यादीच्या स्वरूपात लवकर पाठवा. आपले साहित्य आपण आम्हास anubandh@nemm.org या पत्त्यावर पाठवू शकता. साहित्य पाठवण्याची अंतिम मुदत २० ऑक्टोबर ही असेल.
मुद्रणासंबंधित सर्व अधिकार NEMM समितीकडे असतील.
आपले नाव खाली दिलेल्या लिंकद्वारे नोंदवा
नमस्कार मंडळी,
गणरायाच्या गजरानंतर आता ध्यास लागला आहे दिवाळीच्या रोषणाईचा. चला तर करूया दिवाळीचे स्वागत एक नाही तर दोन जोरदार धमाक्यांनी. नोव्हेंम्बर ४, २०१३ रोजीच्या NEMM दिवाळी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल दोन खुमासदार नाटकांनी सजलेला नाट्यमहोत्सव - "हरवलेल्या पत्त्यांचा बंगला" आणि "खरं खरं सांग!"
निखळ मनोरंजनाने ठासून भरलेल्या या सुप्रसिद्ध नाटकांचे तिकीट बुकिंग आज सुरु करीत आहोत. वेळ न दवडता आपली राखीव सीट आरक्षित करा. दोन्ही नाटकं पाहण्यासाठी दोन वेगवेगळी तिकिटं आरक्षित करावी लागतील.
कार्यक्रमाची रूपरेषा:
१०:०० - रजिस्ट्रेशन (नाटक १)
१०:३० - १:१५ - हरवलेल्या पत्त्यांचा बंगला (नाटक १)
१:१५ - २:३० - आनंद मेळा (खाद्यपदार्थ आणि इतर खरेदी)
२:०० - रजिस्ट्रेशन (नाटक २)
२:३० - ५:३० - हरवलेल्या पत्त्यांचा बंगला (नाटक २)
Want to keep up with our events via email? Please signup for our news letter via Contact Us Form
Copyright © 2023 NEMM - All Rights Reserved.