Loading Events

नमस्कार मंडळी,
नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद घेऊन येत आहे नवीन वर्ष,

बांधूया सेतू मनांचे NEMM COMMUNITY सह … तुम्हा सर्वानां नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. HAPPY NEW YEAR.
नव्या वर्षाची सुरवात म्हणजे मकरसंक्रांतीची चाहूल …

आणि त्या करता आपली न्यू इंग्लंड मराठी मंडळाची २०२४-२५ ची कार्यकारिणी समिती कामाला लागली सुद्धा. समिती आणि न्यू इंग्लंड चे काही उत्साही कलाकार, आपल्या साठी घेउन येत आहेत एक Musical Concert सूर मनांचे.
आपण मराठी माणसं इथे दूरदेशी राहून ही विविध रीतीने एकमेकांशी जोडलेली आहोत कधी ते चित्रसंगीत असतं, तर कधी नाटय संगीताचे प्रेम असते, तर कधी माय मातीशी नाते, तरी कधी तो असतो फक्कड कांदे पोहे आणि मस्त चहा.
चला तर मग भेटूया मकरसंक्रांतीला, या एकमेकाना जोडणाऱ्या सुरांच्या Live कॉन्सर्ट मधे सूर मनांचे

कार्यक्रमाची रूपरेषा:

  • दुपारी २.३० – ४.००: नोंदणी आणि हळदीकुंकू (खास वाण महाराष्ट्रतील अनुभूती प्रशाळे च्या ‘माता बचत गटाने’ बनवलेलं)
  • ३:०० – ३.३०: १-३ वर्ष वयोगटातील मुलांचे बोरनहाण**
  • ३:३० – ४:०० : ५-१२ वर्षांच्या मुलांकरता आर्ट अँड क्राफ्ट**
  • ४.०० – ६:३० : मुख्य कार्यक्रम- स्वागत, Musical Concert सूर मनांचे, जुन्या समितीचे आभार प्रदर्शन, नवीन समितीचा परिचय (मध्यंतर ५ – ५.२०)

मंडळा चा कार्यक्रम तुमच्या अनेकांच्या मदतीनेच यशस्वी होतो आणि त्या करता आम्हाला तुमची गरज आहे. मदतनीस म्हणून नोंदणी करण्यासाठी maya.tamhankar@nemm.org ला ई-मेल करा.

**१-३ वर्ष वयोगटातील मुलांचेबोरनहाणाचे रेजिस्ट्रेशन करण्यासाठी maya.tamhankar@nemm.org ला ई-मेल करा ला ई-मेल करा. ई-मेल मधे तुमचे नाव, फोन नंबर, मुला/मुलीचे नाव आणि वय ही माहिती पाठवा. (५ जानेवारी २०२४ पर्यंत)

**५-१२ वर्षांच्या मुलांकरता आर्ट अँड क्राफ्ट रेजिस्ट्रेशन करण्यासाठी maya.tamhankar@nemm.org ला ई-मेल करा. ई-मेल मधे तुमचे नाव, फोन नंबर, मुला/मुलीचे नाव आणि वय ही माहिती पाठवा. (५ जानेवारी २०२४ पर्यंत)

खाद्यपदार्थ व इतर वस्तू विक्रीसाठी कृपया vmt@nemm.org ला ई-मेल करा.

Dress Code (ऐच्छिक)

मकरसंक्रांतीला पोषाख काय हा प्रश्न महाराष्ट्रीय महिलांना तर कधीच पडणार नाही पण महिलां सोबत पुरुषांनी पण काऴया रंगाचे कपडे घालून सणाचा आनंद लुटावा अर्थात ऐच्छिक