Loading Events

Entries Due by OCT.20th

https://form.jotform.com/NEMM_nemm/nemm-akashkandil-diwali-ank-2024

चला मंडळी, दिवाळी आली – तयारी करू!

आपल्याला जे आवडतं, दुसऱ्याला सांगावंसं वाटतं, ते नेमकेपणानं मांडून ‘आकाशकंदील’ उभारू! 

यात असेल छोट्यांची रांगोळी, मधल्यांचा जोश, आणि मोठ्यांचा रसाळ फराळ. चवीचवीनं खा, आवडीआवडीनं पाहा, आणि इतरांबरोबर वाटूनही घ्या..

आधी आम्हांला गोळा करू द्या.

  • असाल तुम्ही छोटे ( Grade PreK to 4) तर काय कराल? काढा एक चित्र मनातल्या बाप्पाचं. (अगदीच नाही वाटलं, तर आवडेल ते.)
  • असाल तुम्ही मधले (Grade 5-12) तर काय कराल? बघितलंय आम्ही तुम्हाला ढोल वाजवताना. दणाणणाऱ्या तालावर पाय थिरकवताना. सांगा बरं आम्हाला, का आवडतं ते तुम्हाला. किंवा ते नसेल सांगायचं, तर मग सांगा की घरचे लोक खायला लावतात त्या मराठी पदार्थांपैकी तुम्हाला काय आवडत नाही, अगदी अजिबात आवडत नाही. (मराठी/इंग्रजी जमेल त्या भाषेत.)
  • आणि मोठ्या मंडळींनी काय बरं करावं?  आपल्या मराठी नाटकप्रेमाला शब्दांमध्ये बांधावं. लेख लिहा, निबंध लिहा, जमलं तर उतरवा पद्यामधे. ‘नाटका’वर नसेल लिहायचं, तर विषयाचं बंधन नाही हं या गप्पांमध्ये.

महत्वाचं काय तर दिवाळीची गंमत. रांगोळी घालू, लगबग करू, फराळ करू – आकाशकंदील उभारू! चला तर मग, जे काही तुम्हाला द्यायचं असेल – चित्र, कविता, गोष्ट, निबंध, किंवा लेख – ते पूर्ण करून, २० ॲाक्टोबरपर्यंत द्या आम्हाला पाठवून!

https://form.jotform.com/NEMM_nemm/nemm-akashkandil-diwali-ank-2024