नमस्कार मंडळी,
गणरायाच्या गजरानंतर आता ध्यास लागला आहे दिवाळीच्या रोषणाईचा. चला तर करूया दिवाळीचे स्वागत एक नाही तर दोन जोरदार धमाक्यांनी. नोव्हेंम्बर ४, २०१३ रोजीच्या NEMM दिवाळी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल दोन खुमासदार नाटकांनी सजलेला नाट्यमहोत्सव – “हरवलेल्या पत्त्यांचा बंगला” आणि “खरं खरं सांग!”
निखळ मनोरंजनाने ठासून भरलेल्या या सुप्रसिद्ध नाटकांचे तिकीट बुकिंग आज सुरु करीत आहोत. वेळ न दवडता आपली राखीव सीट आरक्षित करा. दोन्ही नाटकं पाहण्यासाठी दोन वेगवेगळी तिकिटं आरक्षित करावी लागतील.