या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल आपल्या स्थानिक कलाकारांनी सादर केलेले एक कौटुंबिक विनोदी नाटक “वाजे पाऊल आपुले”!
ही कथा आहे एका हायपोकॉन्ड्रियाक, प्रोफेसर भुस्कुटे यांची, ज्याला असा विश्वास आहे की त्याला एक मोठा आजार आहे. त्याचा संपूर्ण आधार गैरसमजावर आधारित आहे ज्यामुळे अनेक आनंददायक परिस्थिती निर्माण होतात. ही एक हलकीफुलकी कौटुंबिक कॉमेडी आहे आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकांना याचा आनंद घेता येईल.
या नाटकाव्यतिरिक्त खालील कार्यक्रम आयोजित केले आहेत.
Indian Institute of Technology, Association of Greater New England हि संस्था सर्वांसाठी ३-D Printing तंत्रज्ञानावर आधारित प्रात्यक्षिक आयोजित करणार आहेत. तरी जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा लाभ घ्यावा हि विनंती.
आर्थिक गुंतवणूक या विषयामध्ये रुची असलेल्या सर्वांसाठी एक सुवर्णसंधी! आपले स्थानिक Real Estate Investment क्षेत्रातील विशेषज्ञ श्री संतोष साळवी आपल्या सर्वांसाठी Real Estate गुंतवणूकीच्या संदर्भात मार्गदर्शन करतील.