Loading Events

नमस्कार मंडळी,

संक्रांत, गुढी पाडवा, आणि होळी यापाठोपाठ येणारा उत्सव म्हणजे महाराष्ट्र दिन. १ मे १९६० साली स्थापन झालेले आपले हे महाराष्ट्र राज्य अत्यंत छोट्या कालावधीत भारतातील सर्वात प्रगतिशील राज्य बनले. किंबहुना अमेरिका जगाचे मेल्टिंग पॉट आहे, तर महाराष्ट्र भारताचे मेल्टिंग पॉट आहे. या राज्याने भारतातील सर्व धर्म, जात, पंथाच्या लोकांना आपलेसे केले. आज महाराष्ट्र खऱ्या अर्थाने भारत देशातील सांस्कृतिक, सामाजिक, आणि आर्थिक दृष्ट्या प्रगतिशील राज्य आहे.

अशा या सर्वसम्पन्न राज्याचा या वर्षात येणारा वाढदिवस साजरा करताना एक प्रकारची द्विधा मनस्थिती आपणा सर्वांमध्ये असणार आहे हे निश्चित. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारत देश एका कठीण कालावधीतून जात आहे. आज भारत देशातील जनता सर्व जगाकडे मदतीची याचना करत आहे. एकीकडे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपायचा, त्याचबरोबर त्या मातीचे ऋण फेडायचा विडा NEMM ने उचलला आहे.

NEMM एक आगळावेगळा कार्यक्रम आपल्या भेटीला घेऊन येत आहे. आपल्या सर्वांचा लाडका सचिन पिळगावकर आपल्या भेटीला येणार आहे – सचिनमय: प्रवास एका सुवर्ण कारकिर्दीचा! त्याचबरोबर, NEMM सेवा इंटरनॅशनल च्या बरोबरीने एक मदतीचा हात पुढे करत आहे, आपल्या भारतभूमी आणि तेथील जनतेसाठी!