Glimpses from our past programs
What an amazing experience we had here in Boston with an inspiring and gossebumps worthy tale of our history depicted in Pawankhind!!
Here are some heartwarming reviews we collected from our 3 houseful shows.
Thank you for the support, it helps us keep doing what we do as community for our community!
When
Saturday, February 5, 2022 from 1:30 PM to 6:00 PM EST
Ganapati celebration in America अमेरिका में सबसे बड़ा गणेश विसर्जन समारोह
तीन अत्यंत वेगवेगळ्या स्वभावाचे तरुण रूममेट्स आणि एक सुंदर पण स्वतंत्र विचारांची तरुणी आणि एक चुरशीची निवडणूक, राजकीय प्रचाराची रणधुमाळी, युक्त्या आणि बंडखोरी ह्या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी एकत्र येतात डॉ. विवेक बेळे लिखित "माकडाच्या हाती शॅम्पेन" ह्या धमाल विनोदी नाटकात.....
नमस्कार मंडळी,
आपण सर्वांनी यंदाची होळी आनंदात साजरी केली असणारच. तसेच आपला होळीचा उत्साह द्विगुणित करण्याचा NEMM ने केलेला एक छोटा प्रयत्न देखील आपणा सर्वांना आवडला असेल यात शंका नाही.
मंडळी, आता चाहूल लागलेली आहे येणाऱ्या मराठी नवीन वर्षाची. गुढी पाडव्याने सुरु होणारे नवीन वर्ष दरवर्षी भारतात आणि आता अमेरिकेतदेखील आपण मराठी मंडळी गुढी उभारून साजरे करतो. काळानुसार गुढीबरोबरच रांगोळी, फुलांची आरास, ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक यांचा समावेश होऊ लागला. यंदा COVID मुळे हे सर्व जरी करता येणार नसले तरी दोन गोष्टी मात्र आपण NEMM कर जरूर करणार आहोत.
सर्वप्रथम, आपण आपल्या आचार, विचार, आणि कृतीतुन एक सामर्थ्यवान गुढी उभारूया. अर्थात ही गुढी असेल यश, आरोग्य, मांगल्य, माधुर्य, वैभव, स्थैर्य, आणि संकल्प यांनी युक्त अशी!
आता दुसरी गोष्ट, जी NEMM ला कायम लाभणारी तुमची साथ.
ह्या वर्षीच्या गुढी पाडव्याला करमणुकीची जोड घेऊन NEMM सादर करत आहे - सुमित राघवन आणि नेहा जोशी या सुप्रसिद्ध कलाकारांच्या भूमिका असलेले मराठी नाटक Knock! Knock! सेलिब्रिटी.
आग्रहाचे निमंत्रण आणि तुम्ही येणार नाही, असे होऊच शकत नाही!!
नमस्कार मंडळी,
संक्रांत, गुढी पाडवा, आणि होळी यापाठोपाठ येणारा उत्सव म्हणजे महाराष्ट्र दिन. १ मे १९६० साली स्थापन झालेले आपले हे महाराष्ट्र राज्य अत्यंत छोट्या कालावधीत भारतातील सर्वात प्रगतिशील राज्य बनले. किंबहुना अमेरिका जगाचे मेल्टिंग पॉट आहे, तर महाराष्ट्र भारताचे मेल्टिंग पॉट आहे. या राज्याने भारतातील सर्व धर्म, जात, पंथाच्या लोकांना आपलेसे केले. आज महाराष्ट्र खऱ्या अर्थाने भारत देशातील सांस्कृतिक, सामाजिक, आणि आर्थिक दृष्ट्या प्रगतिशील राज्य आहे.
अशा या सर्वसम्पन्न राज्याचा या वर्षात येणारा वाढदिवस साजरा करताना एक प्रकारची द्विधा मनस्थिती आपणा सर्वांमध्ये असणार आहे हे निश्चित. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारत देश एका कठीण कालावधीतून जात आहे. आज भारत देशातील जनता सर्व जगाकडे मदतीची याचना करत आहे. एकीकडे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपायचा, त्याचबरोबर त्या मातीचे ऋण फेडायचा विडा NEMM ने उचलला आहे.
NEMM एक आगळावेगळा कार्यक्रम आपल्या भेटीला घेऊन येत आहे. आपल्या सर्वांचा लाडका सचिन पिळगावकर आपल्या भेटीला येणार आहे - सचिनमय: प्रवास एका सुवर्ण कारकिर्दीचा! त्याचबरोबर, NEMM सेवा इंटरनॅशनल च्या बरोबरीने एक मदतीचा हात पुढे करत आहे, आपल्या भारतभूमी आणि तेथील जनतेसाठी!
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल आपल्या स्थानिक कलाकारांनी सादर केलेले एक कौटुंबिक विनोदी नाटक "वाजे पाऊल आपुले"!
ही कथा आहे एका हायपोकॉन्ड्रियाक, प्रोफेसर भुस्कुटे यांची, ज्याला असा विश्वास आहे की त्याला एक मोठा आजार आहे. त्याचा संपूर्ण आधार गैरसमजावर आधारित आहे ज्यामुळे अनेक आनंददायक परिस्थिती निर्माण होतात. ही एक हलकीफुलकी कौटुंबिक कॉमेडी आहे आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकांना याचा आनंद घेता येईल.
या नाटकाव्यतिरिक्त खालील कार्यक्रम आयोजित केले आहेत.
3-D Printing Demonstration:
Indian Institute of Technology, Association of Greater New England हि संस्था सर्वांसाठी ३-D Printing तंत्रज्ञानावर आधारित प्रात्यक्षिक आयोजित करणार आहेत. तरी जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा लाभ घ्यावा हि विनंती.
Real Estate Investment Info Session:
आर्थिक गुंतवणूक या विषयामध्ये रुची असलेल्या सर्वांसाठी एक सुवर्णसंधी! आपले स्थानिक Real Estate Investment क्षेत्रातील विशेषज्ञ श्री संतोष साळवी आपल्या सर्वांसाठी Real Estate गुंतवणूकीच्या संदर्भात मार्गदर्शन करतील.
आणि हो!
या वर्षीचा गणेशोत्सव २३ सप्टेंबर रोजी आयोजीत केला आहे. या कार्यक्रमाचे आकर्षण असेल "NEMM Awards Night : हास्याचे शिलेदार"! या मनोरंजनाने परिपूर्ण कार्यक्रमा मध्ये सहभागी होऊन आपले गायन, नृत्य, अभिनय, नाट्य दिग्दर्शन, नृत्य दिग्दर्शन, आणि निर्मिती सहाय्य (सजावट आणि तंत्र सहाय्य इत्यादी) या विविध क्षेत्रामध्ये आपले कौशल्य दाखविण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या फॉर्म द्वारे नोंदणी करावी.
Copyright © 2023 NEMM - All Rights Reserved.